Syllabus FYBA Syllabus
SYBA Syllabus Old
TYBA Syllabus Old
Course Otcomes
- मराठी विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होईल.
- मातृभाषेतून निर्मित झालेल्या साहित्याचे सखोल ज्ञान प्राप्त होईल.
- मराठी साहित्यातून विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोण मिळेल.
- मराठीतील भाषिक कौशल्य आत्मसात केल्याने ते समजातील घटकाशी प्रभावीपणे संवाद साधू शकतील.
- मराठी साहित्य व संस्कृती यांचा मेळ घालून त्याविषयी समाजघटकाशी विद्यार्थी संवाद साधू शकतील.
- मराठी भाषेच्या सर्वकष ज्ञानामुळे साहित्य व संस्कृती या विषयीच्या संशोधनामध्ये प्रभावीपणे वापर करू शकतील.
- वेगवेगळ्या साहित्य प्रकारचा अभ्यास करून त्यातून समजाविषयी ज्ञान अवगत करू शकतील.
- साहित्यातून आत्मसात केलेली नीतीतत्त्वे यांचा वैयक्तिक जीवन संघटन यामध्ये प्रभावीपणे वापर करतील.
- मराठी साहित्यातून विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोण मिळेल.
- साहित्याचे विश्लेषण करता येईल.
- साहित्याची समीक्षा करता येईल.
FYBA-G-1 (1027) आधुनिक मराठी साहित्य आणि उपयोजित मराठी
- मराठी भाषा, मराठी साहित्य व तिची उपयोजितता यांची ओळख होईल.
- विद्यार्थ्यामध्ये आस्वाद घेण्याची क्षमता वाढेल.
- विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन अभिरूचीचा विकास होईल व त्या विषयी स्पष्टीकरण देता येईल.
- व्यक्तिमत्त्व विकसामध्ये भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे सांगू शकतील.
- भाषिक कौशल्ये आत्मसात करता येतील व त्यांची महती त्यांना स्पष्ट करता येईल. विविध भाषिक कौशल्याचा उपयोग व्यवहारामध्ये करता येईल.
- साहित्याच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना जीवन विषयक, समाजाविषयी विश्लेषण करता येईल.
- विविध साहित्य प्रकारांचे विद्यार्थ्यांना विवेचन करता येईल.
- कार्यक्रम संयोजन कसे करावे याविषयी विद्यार्थी चर्चा करू शकतील.
SYBA –G2(2027) आधुनिक मराठी साहित्य आणि उपयोजित मराठी
- चरित्र आत्मचरित्र संकल्पना स्पष्ट होतील.
- पारिभाषिक संज्ञाची ओळख होईल.
- लेखन विषयक नियम स्पष्ट होऊन लेखनात त्याचा वापर करता येईल.
- विविध अर्जाच्या प्रकारातील अर्ज लिहिता येईल.
- सारांश लेखन करता येईल.
- चरित्र-आत्मचरित्र वङ्मयाचा मराठी साहित्यातील वाटचालीचा आढावा घेता येईल.
- चरित्र-आत्मचरित्र यातील घटक त्यांचे वेगळेपण यांचे विवेचन करता येईल.
SYBA S1(2028) मराठी साहित्यातील विविध साहित्यप्रकार
- मराठी साहित्यातील साहित्यप्रकारांविषयी विद्यार्थ्यांना माहिती होईल.
- मराठी साहित्यप्रकारांचे तात्त्विक घटकांचे ज्ञान देणे.
- साहित्यकृतीला मुक्त प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणे.
- साहित्य लेखनाबाबत त्यांना माहिती देता येईल व त्यावर ते चर्चा करू शकतील.
- नाटक व कादंबरी या साहित्य प्रकारांच्या तात्त्विक घटकांचे ते उदाहरणांसह स्पष्टीकरण देऊ शकतील.
- साहित्यकृतीचे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन करण्याची दृष्टी निर्माण करणे.
- नाटकातील विविध घटकांचे ते विश्लेषण करतील.
- कादंबरीतील विविध घटकांचे स्पष्टीकरण करू शकतील.
- साहित्यकृतीला मुक्त प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होईल .
- 10. साहित्याचा सखोल अभ्यास करण्याची क्षमता वाढीस लागून साहित्याचे वर्गीकरण त्यांना करता येईल.
- 11. पदव्युत्तर अभ्यास करण्याची पूर्वतयारी करणे.
- 12. साहित्याचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास करण्याची क्षमता विकसित होईल.
SYBA-S2 (2029) अर्वाचीन मराठी वङ्मयाचा इतिहास (1818 ते 1960)
- मराठी साहित्याच्या ऐतिहासिक परंपरेचे स्थूल ज्ञान होईल.
- साहित्य निर्मितीमागील प्रेरणा, प्रवृत्तीचे ज्ञान होईल.
- वाङ्मयाच्या इतिहासाची ओळख होईल.
- वाङ्मयाच्या अभ्यासामुळे वाङ्मयामध्ये झालेली विविध स्थित्यंतरे ते विशद करू शकतील.
- वाङ्मयाच्या अभ्यासाच्या नव्या दिशांवर ते चर्चा करू शकतील.
- राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे त्यांच्या लक्षात येतील.
- इतिहास लेखनाच्या प्रेरणांवर ते स्पष्टीकरण देऊ शकतील.
- वाङ्मयाचा आस्वाद घेऊन त्याचे वर्गीकरण ते करू शकतील.
TYBA G-3 (3027) आधुनिक मराठी साहित्य आणि व्यावहारिक व उपयोजित मराठी
- निबंध वाङ्मय प्रकाराची व्याख्या करता येईल.
- निबंधाचे विविध प्रकारात वर्गीकरण करता येईल.
- प्रवासवर्णन वाङ्मय प्रकाराची माहिती सांगता येईल.
- निबंध व प्रवासवर्णन यांच्या साहित्य परंपरेचा स्थूल परिचय होईल.
- विद्यार्थ्यांची वाचन व लेखन क्षमता विकसित होईल.
- ग्रंथपरीक्षणाची आवड निर्माण होईल.
- भाषेचे यथोचित आकलन करण्याची क्षमता विकसित होईल.
- साहित्याबद्दलची अभिरूची विकसित होऊन कलाकृतीचा आस्वाद घेण्याची क्षमता वाढेल.
- विविध वाङ्मय प्रकारातील ग्रंथाचे परीक्षण करू शकतील.
- प्रवास वर्णनात्मक लेखाचे मूल्यमापन करता येईल.
TYBA S3 (3028) साहित्यविचार
- भारतीय व पाश्चिमात्य साहित्य विचाराची विद्यार्थ्यांना ओळख होईल.
- साहित्याचे स्वरूप समजून घेता येईल.
- साहित्याची प्रयोजने स्पष्ट करता येतील.
- साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी चर्चा करू शकतील.
- साहित्याची भाषा समजावून घेता येईल.
- भामह, दन्डी, वामन, रुद्रट, भरत, अभिनवगुप्ता या संस्कृत मीमांसकांचा परिचय होईल.
- साहित्य आणि समाज यातील परस्परसंबंध समजतील.
- वाङ्मयीन मूल्ये समजतील.
- पाश्चिमात्य विचारवंत जॉन्सन, अर्नोल्ड, इ. च्या विचारांचे टिकात्मक परीक्षण करू शकतील.
10.साहित्य प्रकाराची संकल्पना समजून घेता येईल.
TYBA S4 – (3029) भाषाविज्ञान
- भाषेची व्याख्या करता येईल.
- भाषेचे स्वरूप, महत्त्व, कार्य भाषेच्या अभ्यासाची प्रमुख अंगे यांचे विश्लेषण करू शकतील.
- भाषा अभ्यासपद्धतीचे विवेचन करू शकतील.
- स्वननिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करता येईल.
- वागिंद्रियांची रचना स्पष्ट होईल.
- स्वर, अर्धस्वर, व्यंजन यांचे वर्गीकरण करता येईल.
- ऐतिहासिक भाषाअभ्यासपद्धतीचे स्वरूप लक्षात येईल.
- भाषाकुलाची संकल्पना जाणून घेऊन मराठी भाषेच्या उत्पत्तीचा अभ्यास करता येईल.
- अर्थ ही संकल्पना व अर्थाचे प्रकार त्यांना विशद करता येतील.
- भाषाकुल संकल्पनेचे विश्लेषण करू शकतील.
FYBA CBCS Pattern 2019
FYBA SEM 1 – मराठी साहित्य : कथा आणि भाषिक कौशल्यविकास [CC-1A]
- कथा या साहित्य प्रकारची ओळख होईल.
- कथा या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख होईल.
- भाषिक कौशल्यविकासाचे महत्त्व समजेल.
- इ.माध्यमांचे ज्ञान अवगत होईल.
- समकालीन साहित्याचे विविध पैलू समजतील.
FYBA SEM 2- मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास [CC-1A]
- एकांकिका या साहित्यप्रकाराची ओळख होईल.
- एकांकिका या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख होईल.
- भाषिक कौशल्यविकासाचे महत्त्व समजेल.
- भाषांतर करण्याचे ज्ञान अवगत होईल.
- संवाद लेखनाला चालना मिळेल.
- कल्पना शक्ती प्रबळ होईल.