विद्यार्थ्यांसाठी सूचना
-
महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थ्यांने ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे.
-
माहिती पत्रकात समाविष्ठ करण्यात आलेले नियम व अटी सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक असतील.
-
विद्यार्थ्यांने महाविद्यालयातील सूचना फलकावर लावण्यात आलेल्या सूचना नियमित पहाव्यात व त्या पालन कराव्यात.
-
महाविद्यालयीन परिसरात गैरवर्तन किंवा बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यां विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व वेळ प्रसंगी प्रवेश रद्द करण्यात येईल.
-
महाविद्यालयीन परिसरात पान, तंबाखू, गुटखा यांचे सेवन करु नये कायद्याने हा गुन्हा आहे.
-
विद्यार्थ्यांने आपले शिष्यवृत्ती फार्म वेळेत online भरून महाविद्यालयात त्याची प्रत जमा करावी.
-
परीक्षेपूर्वी ग्रंथालयातून घेतलेली सर्व पुस्तके परत केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय वार्षिक परीक्षेला बसता येणार नाही.
-
विद्यापीठाने निर्गमित केलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांची ७० टक्के हजेरी असल्या शिवाय परीक्षेचा फार्म भरता येणार नाही.
-
महाविद्यालयात रॅगिंग किंवा लैगिंक छळ होत असल्यास तत्काळ संबंधित समितीशी वा प्राचार्यांशी संपर्क साधावा.
-
विद्यार्थ्यांनी दैनंदिनीत महत्वपूर्ण घटनांची नोंद ठेवणे आवश्यक असून त्या साठी महाविद्यालयात येतेवेळी दैनंदिनी आपल्या जवळ बाळगावी.